।श्री।।

(सनातन धर्म)

हिंदू धर्माची ओळख

हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा महत्त्वाचा धर्म आणि जीवनपद्धती आहे. आजही सनातनी हिंदू माणसे स्वधर्माचा 'सनातन धर्म' असा उल्लेख करतात. हिंदू संस्कृती ही एक पुरातन संस्कृती आहे. तिचे मूळ सिंधू खोऱ्यामध्ये होते. हा धर्म मानणारी माणसे जगात 'हिंदू' या नावाने ओळखली जाऊ लागली. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे ते सिंधू आणि त्याचा अपभ्रंश हिंदू अशी प्रांतीय व्याख्या होते. भारतात राहणाऱ्या लोकांना प्रथम मोगल शासकांनी 'हिंदू' असे म्हणायला सुरुवात केली.

हिंदू धर्मीयांमध्ये असंख्य पंथ आहेत. त्यांपैकी शैव, वैष्णव, शाक्त, माध्व, गाणपत्य, वारकरी, लिंगायत, दत्त संप्रदाय, नाथपंथ, महानुभाव पंथ, गोसावी पंथ हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिंदू धर्माचा संस्थापक नाही; तसेच मुख्य धर्मग्रंथही नाही. धर्माची काही तत्त्वे 'श्रीमद्‌भगवद्‌गीता' या ग्रंथात विशद केली गेली आहेत.
भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या वैविध्यपूर्ण पंथांना, संप्रदायांना, समाजांना आणि जीवनपद्धतींना एकत्रितपणे 'हिंदू धर्म' असे संबोधले जाते. हजारो वर्षांच्या काळात या समाजाने एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारीत एक जीवनपद्धती निर्माण केली. हिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन आहे. निसर्गातील चर, अचर आणि अनेकविध श्रद्धा, संकल्पना व मूल्यांच्या पूजांची परंपरा हीसुद्धा या संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या संपूर्ण संस्कृतीस 'हिंदू धर्म' असे नाव मिळाले.

‘हिंदू धर्माच्या देवता’

हिंदू धर्मातील देवता या हिंदू धर्म आणि परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. हिंदू संस्कृतीने अनेक देवतावाद स्वीकारला असल्याने विविध स्त्री-पुरुष देवतांची उपासना या धर्मात केली जात असल्याचे दिसून येते. हिंदू धर्मातील अनेक पंथांच्या माध्यमातून शंकर, विष्णू, गणपती, देवी, सूर्य, अशा मुख्य देवता आणि त्यांच्या परिवारातील देवता तसेच त्यांच्या उपदेवतांची उपासना केली जाते.

हिंदू धर्मातील देवतांचा विकास वैदीक काळात झालेला आहे. वैदीक काळापासून पुराण काळापर्यंत बऱ्याच देवदेवता आपल्याला प्रचलित असलेल्या सापडतात. उदा:- वरुण, इंद्र, अश्विनीकुमार, ब्रह्मणस्पति, रुद्र, सोम अशा विविध देवता तसेच निसर्गातील आग, पाऊस, वारा, नदी अशा विविध शक्तींना देवतास्वरूप देऊन त्यांची प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मामध्ये देवांची संख्या एकूण ३३ कोटी आहे. यामध्ये बऱ्याच देवतांची नावे आपल्याला परिचित नाहीत म्हणून काही प्रमुख देवांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - गणपती ही देवता प्रथम पूजनीय आहे, तसेच शिव, पार्वती (महाकाली) रिद्धी-सिद्धी, कार्तिकेय, कौमारी, विष्णू, लक्ष्मी (महालक्ष्मी), ब्रह्मदेव, सरस्वती (महासरस्वती) इत्यादी व त्यांचे अनेक अवतार प्रसिद्ध आहेत. अशा देवी, देवता हिंदू धर्मात आहेत आणि असंख्य भक्त या देवतांची मनोभावे पूजा करताना आपल्याला दिसतात.

हिंदू धर्मग्रंथ’



हिंदू सनातन धर्म हा व्यक्ती प्रवर्तित नसून याचा आधार वेदादिक धर्मग्रंथ हा आहे. याची संख्या खूप मोठी आहे. याचे दोन विभाग आहेत -
१) श्रुति:- हा ग्रंथ अपौरुषेय मानला जातो. यामध्ये चार वेदांमधील (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद) संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, वेदांग, सूत्र इत्यादी ग्रंथांची गणना केली जाते.
२) स्मृति:- हा ग्रंथ ऋषीप्रणीत मानला जातो. यामध्ये १८ स्मृति, १८ पुराणे तसेच रामायण व महाभारत हे दोन इतिहास ग्रंथ सुद्धा मानले जातात. त्याचप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र उपनिषद या दोन अतिशय महत्त्वाच्या ग्रंथांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो.

पूजाविधी (देवपूजा)



कोणत्याही देवतेला श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधियुक्त उपचार समर्पण करणे यालाच पूजा म्हणतात.
हिंदू धर्मामध्ये देवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याचे वैयक्तिक अनेक फायदे आहेत. देवपूजेदरम्यान करण्यात येणाऱ्या प्रत्येक क्रियेमागे एक शास्त्र असून त्यामुळे आपले शारिरीक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले राहते.

Stone

पंचायतन पूजा

पंचायतन म्हणजे पाच देवांचा, पाच गुरुंचा, पाच थोर व्यक्तींचा किंवा पाच वस्तूंचा समुदाय आणि त्यांची पूजा. विभिन्न उपास्य देवांना मानत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी....

know more
Stone

गणेश पंचायतन

गणपती ही पंचायतनामधील एक प्रमुख देवता आहे. हिंदू धर्मात सर्वात प्रथम महत्त्व या देवाला दिले जाते. बुध्दीचा व विद्येचा अधिष्ठाता,विघ्नांचा नियंत्रक असा हा देव आहे. गणेश पंचायतनामध्ये ...

know more
Stone

शिव पंचायतन

भगवान शिव ही हिंदू धर्मातील एक मुख्य देवता आहे. त्रिदेव अर्थात ब्रह्मा, विष्णु, महेश यांपैकी महेश म्हणजेच भगवान शिव आहेत. शिव हे जगताचे आदि, मध्य आणि अंत आहेत अशी मान्यता...

know more
Stone

विष्णू पंचायतन

हिंदू धर्मामधील ब्रह्मा, विष्णु, महेश या तीन देवतांपैकी श्रीविष्णू ही प्रमुख देवता मानली जाते. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ते असून ही एक वैदिक देवता आहे. हे पृथ्वीवरील दुष्ट शक्तींचा.....

know more
Stone

सूर्य पंचायतन

सूर्य हा संपूर्ण जगाचा आत्मा आहे. अतिप्राचीन काळापासून आपल्याकडे सूर्याची उपासना केली जात आहे. ग्रहमालेचा हा राजा असून पंचायतनामध्ये सूर्याला विशेष असे स्थान देण्यात आले आहे....

know more
Stone

देवी पंचायतन

पंचायतनामधील ही आणखीन एक मुख्य देवता आहे. शक्ती, जगदंबा, आदिमाया इत्यादी नावांनी ही ओळखली जाते. परब्रह्माशी तुलना केली जाणारी अशी ही संप्रदायातील मुख्य देवता आहे....

know more
Stone

उपनयन संस्कार

हिंदू धर्मात जे मुख्य सोळा संस्कार सांगितले आहेत त्यांपैकी उपनयन हा एक संस्कार आहे. परंपरेनुसार हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णातील लोकांनाच सांगितला आहे......

know more
Stone

विवाह संस्कार

हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी हा पंधरावा संस्कार आहे. ज्यामध्ये विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातलग, सगेसोयरे आणि अग्नि यांच्या साक्षीने पती - पत्नी म्हणून...

know more
Stone

श्राद्ध

मृत पितरांना उद्देशून आपले आवडते पदार्थ ब्राह्मणांना श्रद्धापूर्वक दिले जातात त्याला 'श्राद्ध' असे म्हणतात. श्राद्धाचेच दुसरे नाव ‘पितृयज्ञ’ असे आहे. आपले गतपितर किंवा जीवात्मे आपापल्या कर्मानुसार.....

know more
Stone

उदकशांत

गृहशुद्धी तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यप्राप्ती हे ‘उदकशांत’ करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपण राहत असलेली वास्तू व आपल्या व्यवसायांच्या ठिकाणातील वास्तुमधील नकारात्मक ऊर्जेचा नाश...

know more
Stone

शारदीय नवरात्र

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित एक व्रत आहे. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र.......

know more
Stone

वास्तुशांत

नवीन वास्तू निर्माण करताना व वास्तूची अंतर्गत सजावट करताना बऱ्याच वेळा सूक्ष्म जीवजंतू, कृमि, कीटक, वृक्ष यांची कळत-नकळत हत्या होते. वास्तूवर आघात केला जातो; त्यामुळे त्या......

know more
Stone

रुद्राभिषेक

भगवान शंकरांचे एक नाव 'रुद्र' असे आहे. शंकराच्या पिंडीवर ब्राह्मणद्वारा विशिष्ट मंत्रोच्चारासहीत अभिषेक करून ही पूजा केली जाते. भगवान शंकरांना अभिषेक अत्यंत प्रिय आहे. रुद्राभिषेक हा आपण लघुरुद्र,......

know more
Stone

जनन शांत

दूषित काळात जन्मलेल्या तसेच जन्मतः शरीराकृतीमध्ये दोष असलेल्या बालकांची जी शांत केली जाते त्याला 'जननशांत' असे म्हणतात. बाळाचा जन्म झाल्यापासून बाराव्या दिवशी ही ...

know more
Stone

मूर्ती प्रतिष्ठापना

भारतात मूर्ती पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आणि मूर्तीपूजा परस्पर पूरक गोष्टी आहेत. जेव्हा एखाद्या देवाबद्दल मनातून आस्था, श्रद्धा असते ...

know more
Stone

भूमीपूजन

प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते की आपली स्वतःची जमीन असावी. नंतर त्या जमिनीवर स्वतःचे घर, इमारत किंवा तत्संबंधी काही बांधकाम केले जाते, परंतु ते बांधकाम सुरू ...

know more
Stone

इतर धार्मिक विधी पूजा

गुढीपाडवा पूजा आणि संवत्सरफल वाचन, नवग्रह स्तोत्रपठण, नवग्रह पूजन व हवन, सूर्य जप शांत, चंद्र जप शांत, मंगळ जप शांत, बुध जप शांत, बृहस्पती जप शांत, शुक्र जप शांत.. ...

know more
Stone

राहत्या घरी व देवतेच्या स्थानावर पूजा केल्याने होणारे फायदे

भारतीय संस्कृतीत परंपरा, चालीरीती याला खूप महत्त्व असल्याचे दिसून येते. देशभरातील कोट्यवधी कुटुंबांमध्ये दररोज ,....

know more

WHAT MY CLIENTS​​ SAY ABOUT ME

<

आपल्या सर्व समस्यांचे निराकरण पारंपारिक ज्योतिष पद्धती नुसार कुंडली पाहून केले जाईल.

Call On : +91 8355807266

  • Download
  • Download