जनन शांत

gemstones

जनन शांत

‘जनन शांत’ दूषित काळात जन्मलेल्या तसेच जन्मतः शरीराकृतीमध्ये दोष असलेल्या बालकांची जी शांत केली जाते त्याला 'जननशांत' असे म्हणतात. बाळाचा जन्म झाल्यापासून बाराव्या दिवशी ही शांत केली जाते. त्यावेळी नक्षत्र, अग्नी इत्यादी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. त्यानंतर मात्र एरवी शांत करण्यासाठी योग्य दिवस आणि मुहूर्त पाहून करावी लागते. जननशांती अनेक प्रकारच्या आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे- कृष्ण चतुर्दशी तिथी शांत, आमावास्या तिथी शांत, क्षयतिथी शांत, अश्विनी नक्षत्र प्रथम चरण शांत, पुष्य नक्षत्र द्वितीय व तृतीय चरण शांत, आश्लेषा नक्षत्र शांत, मघा नक्षत्र प्रथम चरण शांत, उत्तरा नक्षत्र प्रथम चरण शांत, चित्रा नक्षत्र प्रथम चरण शांत, विशाखा नक्षत्र चतुर्थ चरण शांत, ज्येष्ठा नक्षत्र शांत, मूळ नक्षत्र शांत, पूर्वाषाढा नक्षत्र तृतीय चरण शांत, रेवती नक्षत्र चतुर्थ चरण शांत, वैधृति योग शांत, व्यतीपात योग शांत, भद्रा (विष्टी) योग शांत, ग्रहण पर्वकाल शांत, यमल शांत, सदंत जन्म शांत, अधोमुखजन्म शांत, माता-पिता, भाऊ-बहीण यांच्यापैकी एकाच्या जन्म नक्षत्रावर जन्म झाल्यास शांत, तीन मुलींनंतर मुलगा किंवा तीन मुलांनंतर मुलगी झाल्यास शांत, सूर्य संक्रमण पुण्यकाल शांत, दग्धयोगशांत, यमघंट योग शांत, मृत्युयोग शांत.

अशा योगांवर बालकाचा जन्म झाल्यास योग्य दिवस पाहून ब्राह्मणद्वारा शांत करून घ्यावी.

आपल्या सर्व समस्यांचे निराकरण पारंपारिक ज्योतिष पद्धती नुसार कुंडली पाहून केले जाईल.

Call On : +91 8355807266

  • Download
  • Download