विष्णू पंचायतन

gemstones

विष्णू पंचायतन

हिंदू धर्मामधील ब्रह्मा, विष्णु, महेश या तीन देवतांपैकी श्रीविष्णू ही प्रमुख देवता मानली जाते. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ते असून ही एक वैदिक देवता आहे. हे पृथ्वीवरील दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी तसेच पाप-पुण्य, जन्म-मृत्यू यांच्या चक्रातून लोकांना मुक्त करण्यासाठी आणि धर्म पुनर्संचयित करण्यासाठी विविध अवतार धारण करतात. त्यामधील श्रीविष्णूंचे दशावतार प्रसिद्ध आहेत.

भगवान विष्णू हे चतुर्भुज म्हणजेच चार हात असलेले असून त्यांच्या एका हातात सुदर्शन चक्र, दुसऱ्या हातात पांचजन्य नावाचा शंख, तिसऱ्या हातात कौमोदकी नावाची गदा आणि चौथ्या हातात पद्म म्हणजेच कमळाचे फूल आहे. हिंदू धर्मातील कल्पनेच्या चित्राप्रमाणे श्रीविष्णू हे अनंतशेषनागावर शयन करत आहेत. त्यांच्या नाभीतून निघालेल्या कमळावर ब्रह्मदेव वसलेले आहेत. श्रीविष्णूंच्या पत्नी श्रीलक्ष्मीदेवी कमलचरणाजवळ बसल्या आहेत. जय व विजय हे वैकुंठाच्या द्वाराचे रक्षक आहेत. विष्णू पंचायतनामध्ये भगवान विष्णू हे मध्यभागी तसेच ईशान्येपासून चार दिशेला शिव, गणेश, सूर्य, देवी अशी स्थापना केली जाते.

भगवान विष्णू व त्यांच्या स्वरूपातील देवतांच्या धार्मिक कार्यासाठी केले जाणारे पूजाविधी खालीलप्रमाणे आहेत-

सत्यनारायण पूजा, विष्णुपूजन, सत्यदत्त पूजा, श्रीनृसिंह जयंती पूजा, अक्षय्य तृतीया पूजा, श्रीराम नवमी पूजा, श्रीकृष्ण जयंती पूजा, विष्णुसहस्रनाम स्तोत्र जप, गजेंद्रमोक्ष स्तोत्र जप, विष्णुसूक्त जप व अभिषेक, पंचसुक्त पवमान जप व अभिषेक, व्यंकटेश स्तोत्र जप, रामरक्षा स्तोत्र जप, लघुरुद्र अभिषेक पूजा, गुरुचरित्र पारायण, नवनाथ भक्तिसार पारायण, पुरुषोत्तम मास (अधिकमास) पूजा, ऋग्वेद संहिता पारायण याग, महारूद्र अभिषेक पूजा, अतिरुद्र अभिषेक पूजा, लघुविष्णू याग, महाविष्णु याग, अतिविष्णू याग, - श्रीमद् भागवत पारायण, श्रीमद्भगवद्गीता पठण, श्री दत्तयाग, दत्तात्रेय जयंती पूजा.

आपल्या सर्व समस्यांचे निराकरण पारंपारिक ज्योतिष पद्धती नुसार कुंडली पाहून केले जाईल.

Call On : +91 8355807266

  • Download
  • Download